‘कल्की’ चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच केली छप्पर फाड कमाई...

    26-Jun-2024
Total Views |
 
Kalki 2898 AD
 
 
मुंबई : 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. २७ जूनला प्रदर्शित होणार्या या चित्रपटाचे प्रदर्शनापुर्वीच कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची हिंदी भाषेतील २ लाख तिकीटं आत्तापर्यंत विकली गेली आहेत. त्यासोबतच या चित्रपटाने अॅडव्हान्स तिकीट बुकिंगमध्ये ५० कोटींचा टप्पा देखील पार केला आहे.
 
 
 
‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट २७ जूनला पॅन इंडिया प्रदर्शित होणार आहे. हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे जो २१० आयमॅक्स स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार असून २ डी, ३ डी मध्ये हिंदी, तमिळ आण तेलुगू भाषेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पडूकोण प्रमुख भूमिकेत असणार आहेत.