मुंबई: नेफ्रो केअर (Nephro Care) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात येणार आहे. २८ ते २ जुलै कालावधीत हा आयपीओ उपलब्ध असणार आहे. एनएसई एसएमई (NSE SME) अंतर्गत आयपीओ नोंदणीकृत होणार आहे.५ जुलैपासून कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed) होण्याची शक्यता आहे. कंपनीने म्हटल्याप्रमाणे, ३ जुलैपासून सहभागाचे वाटप होईल.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओसाठी प्राईज बँड ८५ ते ९० रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी १६०० समभाग व कमीत कमी १४४००० रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांना करावी लागणार आहे.Corporate Capitalventures Pvt Ltd कंपनी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Bigshare Services Pvt Ltd कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा ४ जुलैपासून मिळण्याची शक्यता आहे.
आयपीओआधी कंपनीने ११.१५ कोटींचा निधी अँकर (खाजगी) गुंतवणूकदारांकडून उभारला आहे.एकूण कंपनीने १२३८४०० समभाग (Shares) गुंतवणूकीसाठी ऑफर केले आहेत. डॉ प्रतिम सेनगुप्ता कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.२०१४ साली ही कंपनी स्थापन झाली होती.मुख्यतः ही कंपनी क्लिनिकल व लाईफस्टाईल सोलूशन सेवा सुविधा ग्राहकांना पुरवते.
कंपनीच्या आकडेवारीनुसार,आर्थिक वर्ष २०२२- २३ दरम्यान कंपनीच्या महसूलात ३९८.८४ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर कंपनीचा करोत्तर नफा १९९२०.४१ टक्क्यांनी वाढला होता. ३१ मार्च २०२३ मध्ये कंपनीला १७०९.५१ कोटींचा नफा मिळाला होता जो ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढत १९८९.६० कोटींवर पोहोचला होता. कंपनीच्या करोत्तर नफ्यात ३१ मार्च २०२३ मध्ये १९४.२४ कोटीवरुन वाढत ३१ डिसेंबर २०२३ मध्ये वाढत ३४०.०४ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १४८.३८ कोटी रुपये आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर नवीन आस्थापनेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.