मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क मोठी वाढ झाली आहे. कालचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असताना पुन्हा बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स सकाळी ११.१५ वाजेपर्यंत १६५.५१ अंशाने वाढत ७७५१०.९८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ५९.७५ अंशाने वाढत २३५९७ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ५०७.६० अंशाने वाढत ५९२१७.६५ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३९६.५० अंशाने वाढत ५२१००.४५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात अनुक्रमे ०.८६ व ०.७७ अंशाने वाढ झाली आहे.
बीएसई मिडकॅपमध्ये ०.१६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.५८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०९ व ०.८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात घसरण ऑटो (०.०१%), मेटल (०.३६%), रियल्टी (१.७२%), एफएमसीजी (०.३८%), पीएसयु बँक (०.०२%), तेल गॅस (०.३९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.०२%) समभागात घसरण झाली आहे. तर वाढ बँक (०.६६%), फायनांशियल सर्विसेस (०.५५%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.१८%), आयटी (०.२७%) या समभागात झाली आहे.
सकाळी बीएसईत एक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, एसबीआय, विप्रो, लार्सन, इन्फोसिस, टेक महिंद्रा, सनफार्मा, आयसीआयसीआय बँक, एचसीएलटेक, रिलायन्स, टीसीएस या समभागात वाढ झाली आहे. तर बजाज फायनान्स, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, जेएसडब्लू स्टील, टाटा मोटर्स,पॉवर ग्रीड, एशियन पेंटस, टायटन कंपनी, टाटा स्टील, एम अँड एम, इंडसइंड बँक, नेस्ले, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत आज एक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, डिवीज, हिंदाल्को, एसबीआय, ब्रिटानिया, अपोलो हॉस्पिटल, विप्रो, इन्फोसिस, लार्सन, आयसीआयसीआय बँक, एचसीएलटेक, सनफार्मा, टीसीएस, एचडीएफसी लाईफ या समभागात वाढ झाली आहे तर बीपीसीएल, ओएनजीसी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, अदानी पोर्टस, कोल इंडिया, बजाज फायनान्स, एनटीपीसी, अदानी एंटरप्राईज, आयशर मोटर्स, आयटीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, एशियन पेंटस,पॉवर ग्रीड, टायटन कंपनी, एम अँड एम, नेस्ले, भारती एअरटेल, बजाज ऑटो, सिप्ला, श्रीराम फायनान्स, ग्रासीम, मारूती सुझुकी, एचडीएफसी लाईफ या समभागात घसरण झाली आहे.