मुंबई: आज ५ जी सेवांचे टेलिकॉमसाठी स्पेक्ट्रम बोली (Auction) होणार आहे. या स्पेक्ट्रम बोलीची किंमत ९६२३८.४५ कोटी रुपये आहे. विविध बँडसाठी हा स्पेक्ट्रम ९६१३८.४५ कोटी बेस मूल्यपासून पुढे असणार आहे. यामध्ये ८०० MHz, ९०० MHz, १८०० MHz, २१०० MHz, २३०० MHz, २५०० MHz, ३३०० MHz, २६ GHz यासाठी ही बोली टेलिकॉम कंपन्यांकडून लावली जाणार आहे. मुख्यतः यात तीन कंपन्याचा समावेश आहे ज्यामध्ये भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया यांचा भरणा आहे.
'विद्यमान दूरसंचार सेवा वाढवण्यासाठी आणि सेवांची सातत्य राखण्यासाठी, सरकार मंगळवारी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करेल,' असे याविषयी मंत्रालयाने सांगितले आहे. २०१० साली प्रथम स्पेक्ट्रम बोलीची सुरूवात झाली असून आजचा दहावा स्पेक्ट्रम लिलाव असणार आहे. आज सकाळी १० वाजल्यापासूनच यांची सुरूवात झाली आहे.
विविध रेडिओ व्हेव खरेदी केल्यानंतर हे बँड कंपन्यांकडे २० वर्षासाठी ठेवता येणार आहेत. कंपनीची इच्छा असल्यास १० वर्षांनी बँड पुन्हा सरकारला परत करु शकते. बँडची रक्कम भरण्यासाठी ती हप्त्यात अथवा टप्याटप्याने भरता येणार आहे.
प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे, रिलायन्स जिओने सर्वाधिक रक्कमेचे डिपोझिट भरलेले आहे. त्यामुळे ३००० कोटींची आगाऊ रक्कम भरल्याने रिलायन्सला सर्वाधिक रेडिओ व्हेव मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारती एअरटेल १०५० कोटी व वोडाफोन आयडियाने ३०० कोटी रुपये भरले आहेत. दूरसंचार विभागाने (DoT) 8 मार्च रोजी स्पेक्ट्रम प्रक्रिया सुरू केली.
स्पेक्ट्रम २० वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाईल. यशस्वी बोलीदारांना ८.६५ टक्के व्याजदराने NPV चे संरक्षण करून २० समान वार्षिक हप्त्यांमध्ये पेमेंट करण्याची परवानगी दिली जाईल.या लिलावाद्वारे मिळवलेले स्पेक्ट्रम किमान 10 वर्षांच्या कालावधीनंतर सरेंडर केले जाऊ शकते. या लिलावात घेतलेल्या स्पेक्ट्रमसाठी कोणतेही स्पेक्ट्रम वापर शुल्क (SUC) लागणार नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे.