मुंबई: एस अँड पी ग्लोबल रेटिंगने आपल्या भाकितात भारताच्या जीडीपीबाबत मोठे विधान केले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा जीडीपी ६.८ टक्क्यांवर राहू शकतो असे विधान संस्थेने केले आहे. आशिया पॅसिफिक खंडातील भाकीत मांडताना भारताचा जीडीपी आश्चर्यकारकरित्या ८.२ टक्के राहिल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे. आर्थिक वर्षातील ६.८ टक्क्यांवर आगामी वाढ ही प्रामुख्याने वाढत्या मागणीमुळे व वाढीव व्याजदराने होण्याची शक्यता वर्तवली आहे.
या अहवालात म्हटले आहे की, ' यावर्षी जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन GDP) हा ६.८ टक्के राहू शकतो. वित्तीय तूटीत होणारी घट व वाढीव व्याजदर या कारणांमुळे शेती व्यतिरिक्त इतर क्षेत्रात वाढ होत आहे.' कसे म्हटले आहे. यापूर्वी नुकतेच आरबीआयने भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढीचा दर ७. २ टक्क्यांवर राहू शकतो असे म्हटले होते. ग्रामीण भागातील वाढती मागणी व महागाईवरील नियंत्रण यामुळे ही वाढ होणार असल्याचे अनुमान आरबीआयने केले होते. मात्र ही शक्यता खोडून काढताना एस अँड पी ग्लोबलने ही वाढ ६.८ टक्क्यांवर राहिल असे म्हटले आहे.
याशिवाय आर्थिक वर्ष २०२५-२६ , २०२६-२७ मध्ये एस अँड पी ग्लोबलने वाढीचा दर ६.९ व ७ टक्क्यांवर राहू शकतो असे म्हटले आहे. यापूर्वी फिच (Fitch) ने ७.२ टक्क्यांवर अर्थव्यवस्था राहू शकते असे म्हटले होते. एशिया डेव्हलपमेंट बँक (ADB) ने भारताचा जीडीपी ७ टक्क्यांवर वाढणार असल्याचे म्हटले होते. तर मूडीज रेटिंग व डेलोईट इंडियाने जीडीपी ६.६ टक्क्यांवर राहील असे म्हटले होते. व मॉर्गन स्टेनलेने जीडीपी ६.८ टक्क्यांवर राहील असे म्हटले होते.
चीनसाठी आर्थिक वर्ष २०२४ साठी जीडीपी दर ४.८ टक्क्यांवर राहू शकतो व दुसऱ्या तिमाहीत ४.६ वर राहू शकतो असे म्हटले आहे.