सोने चांदीत गुंतवणूकीची संधी अचानक सोने चांदीत मोठी घसरण

    22-Jun-2024
Total Views | 33

gold silver
 
मुंबई: अमेरिकन फेडरल व्याजदर कपात होईल या आशेनंतर अमेरिकन पीएमआय आकडेवारीनंतर बाजारात सोने वधारले होते. काल झालेल्या वाढीनंतर पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी एस अँड पी ग्लोबलने परचेसिंग मॅनेजर इंडेक्स (PMI) जाहीर केल्यानंतर उत्पादन क्षेत्रातील निर्देशांक मे मधील ५१.३ वरुन ५१.७ वर पोहोचला होता त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील झालेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा कायम राहिली होती. मे मधील सेवा क्षेत्रातील पीएमआय ५४.८ वरुन जूनमध्ये ५५.१ वर पोहोचला आहे.
 
सोन्याच्या वाढत्या दबावामुळे पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. सकाळी १२ वाजेपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात १.६४ टक्क्यांनी घसरण झाली आहे.तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.४५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) सोने निर्देशांक ०.०१ टक्क्यांनी वाढ होत ७१५९४.०० पातळीवर पोहोचले आहे.
 
भारतातील २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ८०० रुपयांनी घसरण होत सोने ६६३५० रुपयांना व २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ८७० रुपयांनी घसरण होत सोने ७२३८० रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईतही सोन्याच्या १० ग्रॅम दरात ८०० ते ८७० रुपयांनी घसरण झाली आहे.

 
शहर             २२ कॅरेट     २४ कॅरेट
 
दिल्ली            ६६५००       ७२५३०
मुंबई.             ६६३५०       ७२५३०
अहमदाबाद    ६६४००      ७२४३०
चेन्नई.              ६६९५०      ७३०४०
कलकत्ता         ६६३५०      ७२३८०
 
चांदीच्या किंमतीतही घसरण -
 
चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवरील चांदी निर्देशांक ०.०० टक्क्याने दुपारपर्यंत सपाट राहिल्याने चांदी ८९१४०.०० रुपये प्रति किलो दरावर कायम राहिली आहे. भारतातील प्रति किलो चांदीचे दर ९२००० रुपयांवर स्थिरावले आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121