मुंबई: सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. विशेषतः कालच्या वाढीनंतर पुन्हा एकदा बाजारात 'कंसोलिडेशन' परिस्थितीत आले आहे का हे अखेरच्या सत्रात पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २७६.५६ अंशाने घसरत ७७२०६.६७ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ४८.४५ अंशाने घसरत २३५१८.५५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३७१.६६ अंशाने घसरण होत ५८४५३.१७ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ३६०.१५ अंशाने घसरत ५१४२३.१० पातळीवर पोहोचला आहे.
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२१ व ०.१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२३ व ०.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात सेक्टर विशेष प्रतिसाद कायम राहिला आहे. बँक (०.६७%), तेल गॅस (०.५१%), रिअल्टी (०.४२%), फायनांशियल सर्विसेस (०.६८%), एफएमसीजी (०.६६%), प्रायव्हेट बँक (०.६२%) समभागात घसरण झाली आहे तर सर्वाधिक वाढ आयटी (१.४९%), मिडिया (१.३०%), मेटल (०.५७%), हेल्थकेअर (०.७५%), मिडिया (१.३०%), कनज्यूमर ड्युरेबल्स (०.८१%) या समभागात सर्वाधिक वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात बीएसईत भारती एअरटेल, इन्फोसिस, विप्रो, टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएलटेक, एम अँड एम, सनफार्मा, एनटीपीसी, पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक, मारूती सुझुकी, जेएसडब्लू स्टील या समभागात वाढ झाली आहे तर एचयुएल, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, लार्सन, एक्सिस बँक, रिलायन्स, एशियन पेंटस, टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा, टायटन कंपनी, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक या समभागात घसरण झाली आहे.
सकाळच्या सत्रात एनएसईत हिंदाल्को, हिरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल, इन्फोसिस, विप्रो, टीसीएस, डॉ रेड्डीज, कोल इंडिया, सिप्ला, श्रीराम फायनान्स, टेक महिंद्रा, एचसीएलटेक, एम अँड एम, आयशर मोटर्स, एनटीपीसी, बजाज ऑटो, सनफार्मा,पॉवर ग्रीड, अपोलो हॉस्पिटल, इंडसइंड बँक, मारूती सुझुकी, जेएसडब्लू स्टील, आयसीआयसीआय बँक या समभागात वाढ झाली आहे तर एचयुएल, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, एक्सिस बँक, बीपीसीएल, एचडीएफसी लाईफ, एशियन पेंटस, कोटक महिंद्रा, एसबीआय, टाटा मोटर्स, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, ग्रासीम, ब्रिटानिया,बजाज फिनसर्व्ह या समभागात घसरण झाली आहे.
आजच्या बाजारातील कलावर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे हेड ऑफ इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले,
'तांत्रिकदृष्ट्या, संपूर्ण दिवस निःशब्द ओपनिंगनंतर बाजार २३४५० ते २२६५०/७७१००-७७६०० च्या दरम्यान फिरला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात अरुंद श्रेणीतील क्रियाकलाप दिसत आहेत जे बैल आणि अस्वल यांच्यातील अनिर्णय दर्शवते. आमचे असे मत आहे की, सध्याचा बाजाराचा पोत दिशाहीन आहे कदाचित व्यापारी दोन्ही बाजूंच्या ब्रेकआउटची वाट पाहत आहेत. वरच्या बाजूला, २३६८०/७७८०० ही तात्काळ ब्रेकआउट पातळी असेल तर २३४५०/७७१०० च्या खाली विक्रीचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. २३६५०/७७७७० च्या वर, बाजार २२७५०-२३८५०/७८०००-७८२०० पर्यंत वर जाऊ शकतो. तथापि, २३४५०/७७१०० च्या खाली बाजार २३२५०-२३३००/७६८००-७६७०० ची पातळी पुन्हा तपासण्याची शक्यता आहे.'