मुंबई: क्विक कॉमर्स कंपनी झेप्टोने (Zepto) कंपनीने ६६५ दशलक्ष डॉलर्सने आपले फंडिग वाढवले आहे. तशी बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, सिरीज एफ (Series F) फंडिगमधून हा निधी कंपनीने जमा केला आहे. या निधीमुळे कंपनीच्या मूल्यांकनात मोठी वाढ होत अस्तित्वात असलेल्या ३.६ अब्ज डॉलर्सवरून दुप्पटीने वाढला आहे. या सिरीज एफ मध्ये Stepstone Group, Nexus Venture Partners, Glade Brook Capital, Goodwater, Lachu Groom या कंपन्यांचा समावेश आहे.
यामध्ये आता Lightspeed Venture Partners, Avenir Growth या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या विस्तारीकरणासाठी हा निर्णय घेतलेला असल्याचे कळते आहे. आगामी एका वर्षात कंपनीचा आयपीओदेखील येणार आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या व्यवसायातील नफा वाढवण्यासाठी गुंतवणूकीत वाढ करण्याचे ठरविले होते. कंपनीने नऊ महिन्यांपूर्वी २३५ दशलक्ष डॉलर्सचा निधी गुंतवणूकदारांकडून उभा केला होता. त्यामुळे तेव्हा कंपनीचे मूल्यांकन १.४ अब्ज डॉलरवर पोहोचले होते.
गेल्या दिवसांत इ कॉमर्स क्षेत्रातील स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली होती. फ्लिपकार्ट, रिलायन्स जियोमार्ट, झोमॅटो, स्विगी इन्स्टामार्ट या कंपन्यांचा समावेश झाल्याने बाजारातील स्पर्धा वाढली आहे. झेप्टोने आता जीएमवी (Gross Merchandise Value) च्या माध्यमातून लोकांमध्ये गेल्यानंतर १ अब्ज डॉलरपर्यंत आपले मूल्यांकन वाढवले होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा ईबीआयटीडीए (कर व इतर खर्च पूर्व नफा) देखील सरकारात्मक होता.
झेपटोने नवीन प्रकार देखील बाजारात आणले आहेत. ज्यामध्ये झेप्टोने पास (Zepto Pass) चा समावेश होतो.कंपनीने नैसगिक व अनैसर्गिक रित्या आपल्या विस्तारीकरणासाठी पावले ठेवल्याने वित्त, धोरणे, उत्पादन, कंपनीची रचनेत पुन्हा नव्यानं निर्मिती सुरू केली आहे.
मुंबईस्थित फर्मने क्विक कॉमर्स क्षेत्रात आपला बाजारातील हिस्सा सातत्याने वाढवत आहे. HSBC ग्लोबलच्या अलीकडील अहवालानुसार, Blinkit ४० टक्के शेअरसह मार्केट लीडर राहिली आहे, तर झेपटोचा बाजार हिस्सा मार्च २०२२ मध्ये १५ टक्क्यांवरून जानेवारी २०२४ मध्ये २२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.