मुंबई : “घायल शेर लौट आया है..!”, असं म्हणत बहुप्रतिक्षित मिर्झापूर सीझन ३ चा टीझर प्रदर्शित झाला होता. आणि आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून ‘मिर्झापूर ३’ ट्रेलरही भेटीला आला असून सीझन ३ Amazon Prime वर ५ जूलैपासून स्र्टिम होणार आहे. 'मिर्झापूर-३' मध्ये गुड्डू भैय्याची सत्तेची महत्त्वाकांक्षा, आपली हुकूमत, सत्तेची गादी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नात असणारा कालीन भैय्या आणि या सगळ्यात सुरू असणारा शह-कटशह, सूडनाट्य दिसणार आहे.
मिर्झापूर ३च्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच स्विटी आणि मुन्ना भैय्याचा खून होतानाचा फ्लॅशबॅक सीन पाहायला मिळतो. तर नेता भाषणाची तयारी करताना दिसतो. त्यानंतर होते ती गुड्डू पंडितची दमदार एन्ट्री. कालीन भैय्या गॉन, गुड्डू पंडित ऑन असं म्हणत तो हातात हातोडा घेऊन चौकात उभारण्यात आलेला कालीन भैय्याचा पुतळा पाडताना दिसतो. तर ट्विस्टमध्ये कालीन भैय्याची बायको बीना त्रिपाठी ही आता गुड्डू पंडितच्या गटात दिसत आहे. आणि शेवटी पंकज त्रिपाठींची अनोखी झलक पाहायला मिळते.
मिर्झापूरमध्ये पंकज त्रिपाठीं सोबतअली फजल, विजय शर्मा, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल,राजेश तैलंग , ईशा तलवार, मेघना मलिका ,अंजुम शर्मा, प्रियांशु पेन्यूली, हर्षिता शेखर गौर, , शीबा चड्ढा असे अनेक कलाकारांच्या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.