मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचालींमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन बाजारातील आर्थिक आकडेवारीत घसरण झाल्यामुळे तसेच मध्यपूर्वेतील दबाव कायम असला तरी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशेने अमेरिकन बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने बाजारातील सोने महागले आहे.
दुपारी १.२० वाजेपर्यंत सोने निर्देशांकातील युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय बाजारातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.१६ टक्क्यांनी वाढ होत सोने ७२७०१.०० पातळीवर किंमत पोहोचली आहे.
देशातील २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ७५० रुपयांनी वाढ होत ६७१५० रुपयांवर पोहोचले आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ८१० रुपयांनी वाढ होत ७३२५० रुपयांवर सोने पोहोचले आहे. मुंबईतील २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ७५० व २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ८१० रुपयांना घसरण झाली आहे.
चांदीच्या किंमतीत मोठी वाढ
चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ झाली. एमसीएक्सवरील चांदी निर्देशांकात दुपारी ०.७५ टक्क्यांनी घसरण होत चांदी प्रति किलो ९०९७८ रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतील चांदीची किंमत १५०० रुपयांनी वाढत प्रति किलो ९४००० रुपयांवर पोहोचली आहे.