वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचे वेळापत्रक व्यस्त; बीसीसीआयकडून मालिकांची घोषणा!

माजी तेज गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांचे निधन

    20-Jun-2024
Total Views |
team india schedule


मुंबई : 
    युएसए व वेस्ट इंडिज संयुक्त यजमानपद टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर ८ अंतर्गत टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुध्द होणार आहे. याआधीच टीम इंडियाचे वर्ल्डकपनंतर होणाऱ्या दौऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या आगामी तीन देशांविरुध्दच्या मालिकांचे वेळापत्रक जारी केले आहे. यात बांग्लादेश, न्यूझीलंड व इंग्लंड हे तीन संघ भारताचा दौरा करणार आहेत.


भारताविरुध्द असे असेल वेळापत्रक


बांग्लादेशचा भारत दौरा

पहिला कसोटी सामना - १९ ते २३ सप्टेंबर २०२४, चेन्नई
दुसरा कसोटी सामना - २७ सप्टे. ते ०१ ऑक्टो., कानपूर
पहिला टी-२० सामना - ०६ ऑक्टो. , धर्मशाला
दुसरा टी-२० सामना - ०९ ऑक्टो. दिल्ली
तिसरा टी-२० सामना - १२ ऑक्टो. हैदराबाद


न्यूझीलंडचा भारत दौरा

पहिला कसोटी सामना - १६ ऑक्टो.-२० ऑक्टो. , बंगळुरु
दुसरा कसोटी सामना - २४ ऑक्टो. - २८ ऑक्टो. , पुणे
तिसरा कसोटी सामना - ०१ नोव्हें. - ०५ नोव्हें. , मुंबई


इंग्लंडचा भारत दौरा

पहिला टी-२० सामना - २२ जानेवारी २०२५, चेन्नई
दुसरा टी-२० सामना - २५ जानेवारी २०२५, कोलकाता
तिसरा टी-२० सामना - २८ जानेवारी २०२५, राजकोट
चौथा टी-२० सामना - ३१ जानेवारी २०२५, पुणे
पाचवा टी-२० सामना - ०२ फेब्रुवारी २०२५, मुंबई
पहिला एकदिवसीय सामना - ०६ फेब्रुवारी २०२५, नागपूर
दुसरा एकदिवसीय सामना - ०९ फेब्रुवारी २०२५, कटक
तिसरा एकदिवसीय सामना - १२ फेब्रुवारी २०२५, अहमदाबाद
 

माजी तेज गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांचे निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे वयाच्या ५२व्या वर्षी निधन झाले आहे. डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोक व्यक्त करण्यात येत असून दिग्गजांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गौतम गंभीर पासून अनिल कुंबळे सह बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीदेखील 'X'वर पोस्ट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.