नवी दिल्ली : बांगलादेशी घुसखोरांची संख्या देशात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या राज्यातील पोलिस बांगलादेशी घुसखोरांना अटक करत आहे. तामिळनाडूमधील इरोड पोलिसांनी ७ बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी बेकायदा कागदपत्रांच्या आधारे तिथेच राहत होते. पोलिस याव्यतिरिक्त अन्य बांगलादेशी घुसखोरांचा ही शोध घेत आहे.इरोड जिल्ह्याच्या पोलिसांनी दि.१९ जूनला ७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. ते पेरुंदुरईच्या पणिक्कम्पालयम येथे राहत होते. पोलिस त्यांची चौकशी करत आहे. एस मोनिरा (२६), मेगामुथा (२४), एस शेखली (३३), बी जाहिद मिया (२६),एम अनारुल इस्लाम (३५),एम मोनिरुल खाजी (४०), एम मेटून(४५) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, पेरुंदुरईच्या एसआयपीसीओटी कॉम्पलेक्समध्ये अनेक उत्तर भारतीय कामगार काम करतात. पेरुंदुराई पोलिसांना गुप्तहेरांकडून माहिती मिळाली की यात काही बांगलादेशींचा सुद्धा समावेश आहे. आणि अनाधिकृत दस्ताऐवजाआधारे ते तिथे वास्तव्य करत आहेत. दरम्यान पोलिसांनी १३ अनाधिकृत दस्ताऐवजाशिवाय राहणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यातील सात जण हे बांगलादेशी नागरिक असल्याचे कळले. चौकशीनंतर या सात जणांना अटक करण्यात आली आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “अटक केलेले लोक पेरुंदुराई येथील एका खाजगी कंपनीत काम करत होते. त्याच्याकडे पासपोर्ट, व्हिसा आदी आवश्यक कागदपत्रे नव्हती. या कारणावरून त्याला अटक करण्यात आली आहे. हे लोक रोजंदारी मजूर म्हणून काम करायचे. काही जणांकडे भारतीयांना दिले जाणारे आधार कार्डेही आढळून आली, ती जप्त करण्यात आली. " दरम्यान पुढील तपास सुरु आहे.