मुंबई : मध्य रेल्वेवर ६३ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेत ठाणे व सीएसएमटी या प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या काम हाती घेण्यात आले होते. रेल्वे प्रशासनाने नियोजन केलेल्या रविवारी २ जून दुपारी ०३:३० वेळेच्या आधीच काम पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने योग्य नियोजनाच्या माध्यमातून रुंदीकरणाचे काम वेळेआधीच संपविले आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेवरील ठाणे व सीएसएमटी स्थानकाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी जम्बो मेगाब्लॉक घेतला गेला. या मेगाब्लॉक कालावधीत प्रवाशांना गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले होते. दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकावरील काम संपुष्टात आले असून दुपारी १२:३० नंतर वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत.
दरम्यान, नियोजित वेळानुसार मेगाब्लॉक ०३:३० वाजता संपणार असून लोकलसेवा पूर्ववत होणार आहे. सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ चे विस्तारीकरण आणि ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ च्या रुंदीकरणाचे काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आले होते. या काळात प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळाले. रस्ते मार्गावर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या.