दुचाकीस्वाराने फेकले मांसाचे तुकडे; संतप्त नागरिकांनी केले आंदोलन!

    19-Jun-2024
Total Views |
Protests in Ajmer

नवी दिल्ली :
राजस्थानमधील अजमेरजवळ एका बाजारात दि. १९ जून २०२४ मांसाचे तुकडे टाकण्या प्रकरणी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले. सीसीटिव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती बाईकवरून जाताना हे कृत्य करताना दिसतो. हिंदू संघटनांनी त्या मांसाला गोमांस असल्याचे सांगितले आहे. तसेच हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बाजार बंद करायला लावला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली.
 
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अजमेरच्या मदनगंज परिसरात ओसवाल मोहल्ल्यात भाजी मार्केट लागते. जिथे लोकांची प्रचंड गर्दी असते. दि. १९ जून रोजी ही सकाळी ११.४५ वाजता एक बाईकस्वार मार्केटमधून मांसाचे तुकडे फेकून जाताना दिसला. त्याच्यावर आरोप आहे की, त्या मांसाच्या तुकड्यात कापलेले पाय आणि अन्य काही शरीराचे भाग आहेत.

दरम्यान थोड्याच वेळात हिंदू संघटनांचे कार्यकर्ते तिथे जमले. आणि संतप्त झालेल्या हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार बंद केला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोहचले. मात्र त्यादरम्यान पोलिस आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. संतप्त जमावाने एसपीच्या गाडीची तोडफोड करायला सुरुवात केली. ज्यात त्यांच्या गाडीची काच तुटली आणि चालक जखमी झाला. परिस्थिती चघळताना पाहून पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली. जवळजवळ दीड तासाच्या अस्थिरतेनंतर बाजार पुन्हा सुरु झाला.
 
याप्रकरणी डीएसपी सिटीच्या महिपाल सिंह यांनी सांगितले की, फेकलेल्या मांसाच्या तुकड्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. जे म्हशीचे अवशेष आहेत. दरम्यान आरोपीला अटक करून त्याची चैौकशी सुरु आहे. एसडीएम अर्चना चौधरी यांनी सांगितले की, मांसाचे तुकडे जाणूनबुजून नाही तर चुकून पडले होते. मात्र पोलिस संपुर्ण प्रकरणाची तपासणी करत आहे.