"ज्यादिवशी हिरवं इंजिन ऑईल बंद होईल...;" नितेश राणेंचा उबाठावर हल्लाबोल

    19-Jun-2024
Total Views |
 
Nitesh Rane
 
मुंबई : ज्यादिवशी हिरवं इंजिन ऑईल टाकणं बंद होईल तेव्हा उबाठा नावाचं इंजिन महाराष्ट्रात बंद होईल, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच आज शिवसेनेच्या वर्धापनदिनासोबतच मियां उद्धवजी पाकसेनेचाही वर्धापन दिन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
नितेश राणे म्हणाले की, "पाकिस्तानमध्ये मोठी होत चाललेल्या मियां उद्धवजी पाकसेनेचाही आज वर्धापन दिन आहे. या पाकसेनेच्या प्रचारासाठी सगळीकडे पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले. प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारात पाकिस्तान जिंदाबाद असे नारे ऐकू आलेत. या पाकसेनेमुळे मुंबईमध्ये आज जागोजागी हिरवे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला आले तर नवल वाटण्याची गरज नाही," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  महाविकास आघाडीत ३ दिवसांत ५ मुख्यमंत्री!
 
ते पुढे म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या काळात मुंबईत कुणाचीही हिरवा झेंडा लावण्याची हिंमत नव्हती. पण आज मियां उद्धवमुळे जागोजागी पाकिस्तानचे झेंडे, बांग्लादेशी आणि रोहिंगे मुसलमान दिसत आहेत. त्यामुळे आज एकनाथ शिंदेंनी भूमिका घेतली नसती तर बाळासाहेबांचं नाव उद्धवसेनेच्या बॅनरवर दिसलंही नसतं."
 
संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, "संजय राऊतांनी मिश्कील टोले लगावण्यापेक्षा तुमच्यात हिंमत असेल तर उबाठाने स्वत:च्या ताकदीवर आमदार निवडून आणावेत. उबाठा नावाचं इंजिन बंद पडत चाललेलं असताना त्यात हिरवं इंजिन ऑईल टाकून ते सुरु आहे. ज्यादिवशी ते हिरवं इंजिन ऑईल टाकणं बंद होईल तेव्हा उबाठा नावाचं इंजिनच महाराष्ट्रात बंद होईल," असा टोला त्यांनी लगावला आहे.