शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मंत्री लोढांकडून शुभेच्छा!
19-Jun-2024
Total Views |
मुंबई : बुधवारी शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन असून मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षातील सर्व शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, यावर्षी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
"याप्रसंगी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होते. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले असून या महाराष्ट्राच्या मातीचा गौरव पदोपदी केला आहे. आज शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा खरा वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत, याचा अतिशय आनंद आहे. प्रत्येक शिवसैनिकाची आपुलकीने काळजी घेणारे आणि पक्षाची मूठ घट्ट बांधून ठेवणारे त्यांचे नेतृत्व पक्षासाठी नेहमीच पोषक ठरेल. आज त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाची नवी उंची गाठेल हा विश्वास आहे," असे मत व्यक्त व्यक्त करत मंत्री लोढांनी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमीत्त आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.