मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव हटल्याने कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने ही घसरण तेलाच्या पातळीत झालेली वाढ व प्रति बॅरेल झालेल्या मागणीत घट यामुळे बाजारात कच्च्या (Crude) तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे.
काल चीनच्या पीपल बँक ऑफ चायनाने आकडेवारी जाहीर केली होती. चीनच्या क्रूड ( कच्च्या) तेलाच्या प्रक्रियेत इयर ऑन इयर बेसिसवर ०.३ टक्क्यांनी घट झाली आहे. चीनच्या तेलाच्या प्रोसेसिंग (प्रक्रियेत) मे महिन्यात ६०.५ लक्ष टन उत्पादन होते (दिवसाला १४.२५ लक्ष प्रति बॅरेल) इतके उत्पादन होते. मध्यपूर्वेतील परिस्थिती शांत झालेली असली तरी तज्ञांच्या मते पुन्हा मध्यपूर्वेतील दबाव वाढत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊ शकते.
तसेच जगातली कच्च्या तेलाच्या मागणीत ८९०००० प्रति बॅरेलने घट झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. दुपारपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Future निर्देशांकात ०.४८ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर Brent निर्देशांकात ०.४९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात घसरण दुपारपर्यंत ०.०३ टक्क्यांनी घसरण होत कच्च्या तेलाची किंमत ६६२८.०० प्रति बॅरेलवर पोहोचली आहे.
सोन्याच्या दरात घसरण -
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मुख्यतः युएस मधील आगामी रिटेल सेल्सची आकडेवारी व आज होणारे फेडरल रिझर्व्ह बँकेचे भाषण या धर्तीवर ही वाढ झाली होती. दुपारपर्यंत डॉलरच्या किंमतीत वाढ झाल्याने व यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात घसरण झाली आहे. हा निर्देशांक ०.३२ टक्क्यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत घसरला आहे. तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत ०.१२ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एमसीएक्सवरील सोने निर्देशांकात दुपारपर्यंत ०.२२ टक्क्यांनी घसरण होत ७१२९२.०० पातळीवर किंमत पोहोचली आहे.
भारतातील २२ व २३ कॅरेट सोन्याचे सरासरी प्रति १० ग्रॅम दरात १०० ते ११० रुपयांवर घसरण झाली आहे. २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने १०० रुपयांनी घसरत ६६२०० रुपये पातळीवर पोहोचले आहे तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ११० रुपयांनी घसरत ७२२२० पातळीवर पोहोचले आहे.
कच्च्या तेलाच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे एव्हीपी रिसर्च एनालिस्ट कायनात चैनवाला म्हणाले,'यूएस मधील महागाई थंड होण्याच्या चिन्हावर मागील आठवड्यात १.६% वाढल्यानंतर, आठवड्याच्या सुरुवातीला COMEX सोन्याच्या किमती घसरल्या. मऊ चलनवाढीचा आकडा आणि यूएस साप्ताहिक बेरोजगार दाव्यांमध्ये अनपेक्षित वाढ झाल्यामुळे FOMC धोरण परिणाम असूनही, Q3 २२०४ मध्ये Fed ची खात्री पटली आहे. ताज्या टिप्पण्यांमध्ये, फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ फिलाडेल्फियाचे अध्यक्ष पॅट्रिक हार्कर म्हणाले की त्यांच्या सध्याच्या अंदाजानुसार या वर्षासाठी एक व्याज-दर कपात योग्य आहे असे त्यांना वाटते, ते जोडून त्यांना महागाई सुधारण्याचे "अनेक" महिने पहायचे आहेत. स्वॅप्सची किंमत आता नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वर्षासाठी दोन दर कपातीमध्ये आहे. दिवसासाठी, यूएस किरकोळ विक्री, युरोझोन सीपीआय आणि फेड भाषण बाजार हलवू शकतात.
WTI क्रूड ऑइल फ्युचर्स जवळजवळ २% वाढले आणि मे महिन्याच्या अखेरीपासून सर्वोच्च पातळीवर बंद झाले, उन्हाळ्याच्या ड्रायव्हिंग हंगामात अपेक्षित वाढलेली मागणी, वाढलेला भौगोलिक-राजकीय तणाव आणि प्रमुख तेल उत्पादक पुरवठा कडक ठेवतील या अपेक्षांमुळे आशावाद वाढला. OPEC, EIA आणि IEA कडील नवीनतम मासिक अहवाल २H 2024 मध्ये तेलाच्या मागणीत वाढ झाल्याचे सूचित करतात. दरम्यान, रशिया आणि इराक सारख्या OPEC सदस्यांनी उत्पादन कोट्याचे पालन केल्याची पुष्टी केली आणि सौदी अरेबियाने बाजाराला प्रतिसाद म्हणून उत्पादन समायोजित करण्याची इच्छा दर्शविली. परिस्थिती. मध्य पूर्वेतील तणावानेही बाजार खाली ठेवला.'