IPO Update: Stanley Lifestyles Limited कंपनीचा आयपीओ २१ जूनपासून गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल

प्राईज बँड ३५१ ते ३६९ रुपये प्रति समभाग निश्चित

    18-Jun-2024
Total Views |

IPO
 
मुंबई: स्टेनले लाईफस्टाईल लिमिटेड (Stanley Lifestyle Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात दाखल होत आहे. २१ जून ते २५ जून कालावधीत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. या आयपीओत गुंतवणूकीस‌‌‌ ०.५४ कोटी समभाग (Shares) गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतील. कंपनीचा आयपीओ बीएसई एनएसई या दोन्ही शेअर बाजारात उपलब्ध असणार आहे. २८ तारखेपासून ही कंपनी सूचीबद्ध (Listed) होण्याची शक्यता आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओत ०.९१ कोटींचे समभाग ऑफर फॉर सेल (OFS) करिता उपलब्ध असतील. कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड ३५१ ते ३६९ रुपये प्रति समभाग निश्चित केलेला आहे. गुंतवणूकीसाठी ४० समभागांचा एक गठ्ठा (Lot) उपलब्ध असेल. गुंतवणूकदारांना कमीत कमी गुंतवणूकीसाठी १४७६० समभाग खरेदी करावे लागणार आहेत.
 
Axis Capital Limited, ICICI Bank, JM Financial Limited, SBI Capital Markets Limited या कंपन्या आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत तर Kfin Technologies Limited ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओसाठी पात्र झालेल्या गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २६ जूनपासून होणार आहे. तर अपात्र गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २७ जूनपर्यंत होणार आहे. २८ जूनपासून कंपनीचे समभाग शेअर बाजारात नोंदणीकृत होणार आहे.
 
एकूण आयपीओपैकी ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे तर ३५ टक्के वाटा रिटेल (किरकोळ) गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे तर विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांच्यासाठी १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.
 
सुनिल सुरेश व शुभा सुनिल हे कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) आहेत. २००७ साली ही कंपनी स्थापन झाली होती. कंपनी फर्निचर कंपनी आहे. स्टेनले ब्रँड अंतर्गत कंपनी विविध फर्निचर उत्पादन व सेवा पुरवते. कंपनीला ३१ मार्च २०२३ पर्यंत महसूलात ४२.९४ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये ५०.६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२३ मध्ये कंपनीच्या महसूलात ४२५.६२ कोटींच्या तुलनेत घसरण होत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ३२२.२९ कोटींवर पोहोचले. करोत्तर नफ्यात ३१ मार्च २०२३ मधील ३४.९८ कोटींच्या तुलनेत घसरण होत ३१ डिसेंबर २०२३ तुलनेत घसरत १८.७० कोटींवर पोहोचले होते.
 
कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) २१०३.९४ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर कंपनी नवीन स्टोअर खरेदी करण्यासाठी, अँकर स्टोअरवरील खर्चासाठी, नुतनीकरणासाठी, नवीन मशिनरी व उपकरणे खरेदी करण्यासाठी, भांडवली खर्च करण्यासाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.