मुंबई: संरक्षण व अंतराळ या समभागांच्या मूल्यांकनात मोठी वाढ होत असताना आज पुन्हा एकदा एचएएल (Hindustan Aeronautics Limited HAL) समभागात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने कंपनीच्या अंतर्गत कारणांमुळे झालेली आहे. कंपनीला संरक्षण मंत्रालयाने १५६ Light Combat Helicopters साठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) दिल्याने शेअर बाजारात कंपनीच्या समभागात (Shares) मध्ये वाढ झाली आहे.
सेबीच्या ३० व्या अधिनियमानुसार (listing obligations Disclosure Requirements २०१५)अनुसार कळवण्यात यैत आहे की आम्हाला संरक्षण मंत्रालयाने १५६ लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरसाठी ' रिक्वेस्ट फॉर प्रपोजल देण्यात आले आहे असे बंगलोर स्थित पीएसयु हिंदुस्थान एरोनॉटिकस कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
यामधील भारतीय आर्मीसाठी ९० विमाने व एअरफोर्ससाठी ६६ विमाने मागवण्यात आली आहेत. भारतीय आर्मी व एअरफोर्ससाठी असणारी ही हेलिकॉप्टर सुमारे ४५००० कोटींहून अधिक किंमतीची असणार आहेत. एप्रिल महिन्यात संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थान एरोनॉटिकसला एलसीए (LCA Market 1A) फायटर जेट साठी टेंडर मागविले होते.
ही बातमी आल्यानंतर शेअर बाजारात हिंदुस्थान एरोनॉटिकचा शेअर उसळला होता. दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत हा शेअर बीएसईत ६.५२ टक्यांनी वाढत ५५३८.८५ रुपयांवर तर एनएसईतील शेअर ६.४५ टक्क्याने वाढ वाढत ५५३०.९० रुपये प्रति शेअरवर पोहोचला आहे.