नवी दिल्ली : आमच्याच पक्षाने ईव्हीएम आणले होते, ते सुरू झाले तेव्हा सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा होत्या, असे सांगत काँग्रेस ज्येष्ठ नेते लक्ष्मण सिंह यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले, निवडणूक काळात काँग्रेसने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप भाजपवर केला होता. त्यावर आता काँग्रेस नेत्याकडूनच स्पष्टीकरण आले आहे.
दरम्यान, २०२४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ईव्हीएममध्ये गडबडी केल्याचा आरोप भाजपवर केला होता. तसेच, आतादेखील ईव्हीएम हँक केले जाऊ शकते असा दावा अनेक जण करतात. आता यावर दिग्विजय सिंह यांचे भाऊ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सिंह यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले, ईव्हीएमवरील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेच ईव्हीएम आणले होते त्यामुळे आता त्यावर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. माध्यमांशी संवाद साधताना नेते लक्ष्मण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही, केंद्रीय दलाच्या उपस्थितीत ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकत नाही.” असा सल्ला इलॉन मस्क यांना देतानाच त्यांनी आपल्या देशाची चिंता करावी, इथली नाही, असेही ते म्हणाले.