मुंबई: फाल्कन टेक्नोप्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड (Falcon Technoprojects India Limited या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी १९ ते २१ जूनपर्यंत बाजारात दाखल होणार आहे. सोमवारपर्यंत आयपीओतील समभागाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. एनएसई एसएमई (NSE SME) प्रवर्गात हा आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार आहे. २६ जूनपर्यंत ही कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत होणार आहे.
कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड ९२ रुपये प्रति समभाग निश्चित केलेला आहे.समभागांचा एक गठ्ठा (Lot) १२०० समभागांचा असेल. Kunvarji Finstock Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत तर Kfin Technologies Limited ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत तर मार्केट मेकर म्हणून Mikun Stock Borkers काम पाहणार आहेत.
अपात्र झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २५ जूनपासून होणार आहे.कंपनी आयपीओसाठी १४.८८ लाखांचे समभाग उपलब्ध करणार आहे. एकूण आयपीओपैकी ५० टक्के वाटा रिटेल (किरकोळ) गुंतवणूकदारांसाठी बाजारात उपलब्ध आहे तर इतर समभाग धारकांना व गुंतवणूकदारांना ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.भरत परिहार, शितल परिहार हे कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) आहेत. २०१४ साली स्थापन झालेली कंपनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लमबिंग सेवा ग्राहकांना पुरवते. याशिवाय एअर कंडिशनिंग,पॉवर, लाईंटिंग व तत्सम सेवा कंपनी पुरवते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२३ मध्ये कंपनीचे महसूल १६५६.५९ कोटी रुपये होते जे ३१ मार्च २०२४ पर्यंत कमी होत १०३६.६२ कोटींवर पोहोचले आहे. करोत्तर नफ्यात देखील ३१ मार्च २०२३ मधील १०३.९२ कोटींच्या तुलनेत घसरण होत ८६.९८ कोटींवर पोहोचला आहे कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४९.२८ कोटी रुपये आहे.
कंपनीच्या माहितीप्रमाणे, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. सध्या प्रवर्तकांचे भागभांडवल कंपनीत ८४.२० कोटी रुपये आहे.