IPO Update: Durlax Top Surface कंपनीचा आयपीओ १९ जूनपासून बाजारात

प्राईज बँड ६५ ते ६८ रुपये प्रति समभाग निश्चित

    17-Jun-2024
Total Views |

IPO
 
 
मुंबई: डुर्लक्स टॉप सर्फेस (Durlax Top Surface Private Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) १९ जूनला बाजारात दाखल होणार आहे. १९ ते २१ जून कालावधीत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २४ जून २०२४ पर्यंत कंपनी सूचीबद्ध (Listing) होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी ६५ ते ६८ रुपये प्रति समभाग प्राईज बँड निश्चित केला आहे. गुंतवणूकीसाठी २००० समभाग (Lot) उपलब्ध असणार आहेत. कंपनी गुंतवणूकीसाठी ४२ लाख शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणणार आहे.
 
आयपीओसाठी गुंतवणूकदारांना कमीतकमी १३६०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. Expert Global Consultants Private Limited ही कंपनी बुक लिडींग मॅनेजर म्हणून आयपीओसाठी काम पाहणार आहे तर Bigshare Services Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे तर मार्केट मेकर म्हणून Globalworth Securities कंपनी काम पाहील.
 
पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २४ जूनपर्यंत करण्यात येणार आहे तर अपात्र गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २५ जूनपासून मिळणार आहे. आयपीओनंतर कंपनी २६ जूनला सूचीबद्ध होणार आहे. एकूण आयपीओपैकी ५० टक्के वाटा पात्र संस्थापक गुंतवणूकदारांसाठी (QIB) उपलब्ध असणार आहे तर ३५ टक्के वाटा रिटेल (किरकोळ) गुंतवणूकदारांसाठी बाजारात उपलब्ध असेल तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) गुंतवणूकदारांना १५ टक्क्यांपर्यंत वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.
 
२०१० साली ही कंपनी स्थापन झाली होती. श्रावण सुतार व ललित सुतार हे कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) असून ही कंपनी सरफेस मटेरियल व तत्सम उत्पादने पुरवठा करते. ही कंपनी वापी गुजरात येथे स्थित आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीच्या महसूलात (Revenue) मध्ये ३५.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर करोत्तर नफ्यात ( Profit After Tax) मध्ये १४१.१५ टक्यांनी वाढ झाली आहे.
 
कंपनींच्या अधिकृत आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीच्या महसूलात ६६८४.२० कोटीवरून वाढ होत ३१ मार्च २०२४ पर्यंत ९०८३.९३ कोटींवर पोहोचली आहे. तर करोत्तर नफ्यात ३१ मार्च २०२३ मधील २०९.४४ कोटींच्या तुलनेत वाढ होत ५०५.०७ कोटींवर नफा पोहोचला आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ११३.०७ कोटी रुपये आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी, व इतर खर्चासाठी वापरला जाणार आहे.