मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो,मुंबई विभागाच्या माध्यमांतून दि. १३ जून २०२४ पासून नशा मुक्त भारत पंधरवडा हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. दि. १७ जून २०२४ रोजी दादर स्थानकाजवळ अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात ८०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. ज्यात आरपीएफ कर्मचाऱ्यांचा ही सहभाग होता. यावेळी अंमली पदार्थ विरोधी ई-प्रतिज्ञापत्राचा प्रचार करण्यात आला.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आरसीटी मॉल (घाटकोपर), सीआयएसएफ युनिट बीएआरसी (मुंबई), गिरगाव चौपाटी, सीएसएमटी रेल्वे स्थानक, गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा ही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.