मुंबई: डीईई डेव्हलपमेंट इंजिनियर्स लिमिटेड (DEE Development Engineers Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी १९ जूनपासून दाखल होणार आहे. DEE Piping System कंपनी आयपीओतून १.६ कोटीं समभाग (Shares) विक्रीसाठी काढणार आहे.या पब्लिक इश्यूचे मूल्य ३२५ कोटींच्या घरात असणार आहे. हा आयपीओ ( IPO) १९ जून ते २१ जून काळात बाजारात येईल. कंपनीच्या समभागाचे वाटप २४ जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा आयपीओ एनएसई व बीएसईत येणार असून ही कंपनी सूचीबद्ध (Listing) होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड १९३ ते २०३ रुपये प्रति समभाग इतका निश्चित केलेला आहे. कमीत कमी गुंतवणूकदारांना १४८१९ कोटींची गुंतवणूक आयपीओत करावी लागणार असून एक समभागाचा गठ्ठा (Lot) ७३ समभागांचा असणार आहे.SBI Capital Markets Limited, Equirus Capital Private Limited या कंपन्या आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत तर Link Intime India Private Limited ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहेल.कंपनीच्या एका समभागाचे दर्शनी मूल्य (Face Value)१० रुपये प्रति समभाग आहे.
पात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २४ जूनला पूर्ण होणार असून अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २५ जूनला होऊ शकतो. २६ जूनला हा आयपीओ बाजारात सूचीबद्ध होणार आहे. एकूण आयपीओपैकी ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांच्यासाठी उपलब्ध असणार असून ३५ टक्के वाटा किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांना उपलब्ध असणार आहे. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांना (NII) यांच्यासाठी १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.
क्रिष्णन ललित बन्सल, अशिमा बन्सल, DDE Piping Components Private Limited हे कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) आहेत. १९८८ साली या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यतः इंजिनिअरिंग कंपनी असून तेल गॅस, उर्जा, केमिकल व उत्पादन क्षेत्रातील इतर सेवा पुरवते. कंपनी पाईप व इतर तत्सम उत्पादने सेवा सुविधा देखील पुरवते.कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार, कंपनीला ३१ मार्च २०२३ पर्यंत महसूलात ३०.४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे करोत्तर नफा (Profit After Tax) मध्ये ५८.२५ टक्क्यांनी वाढ झाली होती. ३१ डिसेंबर २०२३ मध्ये मार्च २०२३ मधील ६१४.३२ कोटीवरून महसूल घटत ५५७.८६ कोटींवर पोहोचला होता. तर करोत्तर नफ्यात मार्च २०२३ मधील १२.९७ कोटींच्या तुलनेत वाढ होत १४.३४ टक्क्यांवर पोहोचले होता.
कंपनीचे सध्या एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) १४०१.६९ कोटी रुपये आहे. या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर कंपनी वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, थकीत देयांची मुदतपूर्व फेडण्यासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी केला जाणार आहे.