नवी दिल्ली : चांद्रयान -१ या पहिल्या चांद्रमोहिमेचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचं निधन झाले आहे. ७१ वर्षीय हेगडे यांच्यावर किडनीशी संबंधित आजारावर उपाचार सुरु होते. त्यामध्ये हद्यविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ३० वर्षापेक्षा अधिक काळ हेगडे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोमध्ये कार्यरत होते. २००८ मध्ये भारताच्या पहिल्या चांद्रयान १ या इस्त्रोच्या महत्त्वाच्या मोहिमेत हेडगे यांची भुमिका महत्त्वाची होती. सेवानिवृत्तीनंतर हेगडे हे बेंगलुरुमधील स्टार्टइअप टीमशी जोडले गेले होते. त्यांच्यापश्चात हेगडे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.
दरम्यान इस्रोचे माजी शास्त्रज्ञ आणि URSC संचालक एम अन्नादुराई यांनी हेगडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अन्नादुराई म्हणाले, “मी १९८२ मध्ये इस्रोमध्ये रुजू झालो तेव्हा श्रीनिवास हेगडे माझे बॉस होते. चांद्रयान-१ आणि इतर अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे ते उत्कृष्ट सहकारी होते.”
इस्रोसाठी महत्त्वाचे योगदान:
श्रीनिवास हेगडे यांनी १९७८ ते २०१४ या काळात इस्त्रोमध्ये आपली महत्त्वपुर्ण भुमिका बजावली. यूआर राव सॅटेलाइट सेंटर (URSC) चे सदस्य म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांमध्ये योगदान दिले. यूआएससी हे पूर्वी इस्त्रोचे उपग्रह केंद्र म्हणून ओळखले जात होते. हेगडे यांनी इस्रोमध्ये विविध भूमिकांमध्ये काम करताना अनेक महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने चांद्रयान-१ मोहिमेसह अनेक वैज्ञानिक आणि तांत्रिक यश संपादन केले होते.