मुंबई: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाची कंपनी होंडाई मोटर्स कंपनीचा आयपीओ बाजारात येणार आहे. यासाठी शुक्रवारी संध्याकाळी कंपनी सेबीकडे अर्ज करू शकते. अहवालातील माहितीप्रमाणे, २५ ते ३० अब्ज डॉलर्स म्हणजेच हा आयपीओ २५००० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा आयपीओ मुल्यांकनानुसार भारतातील सर्वात मोठा आयपीओ (IPO) ठरण्याची शक्यता आहे. कंपनी या आयपीओतून १४.२ दशलक्ष शेअर्स विकू शकते. कंपनीच्या विस्तारिकरणासाठी या आयपीओतील निधी वापरला जाण्याची शक्यता आहे. कंपनीने डीएचाआरपी (DRHP) मधील भरलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीला ६६०७ कोटींचा ईबीआयटीडीए (कर व इतर खर्च पूर्व नफा) मिळाला होता.
होंडाई कंपनीचा भारतातील पहिली आयपीओ ठरणार आहे. कंपनीने यासंबंधीची माहिती तीन ते चार महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना दिली होती. तेव्हा भारतात त्यांचे आयपीओ आणण्याचे मनसुबे असल्याचे कंपनीने तेव्हा स्पष्ट केले होते. कंपनीच्या विस्तारिकरणा सोबतच कारखान्यासाठी नवीन जागा खरेदी करण्यासाठी या आयपीओतील निधी वापरला जाणार आहे. सुत्रांच्या माहितीप्रमाणे, कोटक महिंद्रा, एचएसबीसी बँक, जेपी मॉर्गन,मॉर्गन स्टेनले या कंपन्या आयपीओसाठी बँकर म्हणून काम पाहण्याची शक्यता आहे. होंडाई ही मारूती सुझुकीनंतर क्रमांक दोनची कार बनवणारी कंपनी आहे.