अदानी समुहाने ' या' सिमेंट कंपनीचे अधिग्रहण केले त्यानंतर शेअरमध्ये उसळी

कंपनीचे सलग तिसऱ्यांदा सिमेंट कंपनीचे अधिग्रहण

    14-Jun-2024
Total Views |

Adani
 
 
मुंबई: अदानी समुहाने आपले विस्तारीकरण सुरूच ठेवले आहे. त्यांच्या सिमेंटमध्ये भारतातील क्रमांक एकचे सिमेंट होण्याच्या महत्वकांक्षेला चार चांद लागले आहेत. कारण अदानी समुहाने पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड (PCIL) कंपनीचे १०४२२ कोटींना अधिग्रहण केले आहे. दोन वर्षांत अदानी समुहाचे हे तिसरे अधिग्रहण (Acquisition) आहे. यापूर्वी अदानी समुहाने अंबुजा सिमेंटचे अधिग्रहण केले होते.
 
अधिग्रहणाबाबत बोलताना अंबुजा सिमेंटने सांगितले आहे की, ' येत्या तीन चार महिन्यांत हा करार तडीस नेला जाईल. या अधिग्रहणामुळे वर्षाला १४ दशलक्ष टनने कंपनीची क्षमता वाढणार असून अदानी समुहाच्या सिमेंट व्यवसायाची क्षमता ८९ एमटीपीए (MTPA) वर पोहोचले ' असे म्हटले आहे. सध्याच्या घडीला पेन्ना सिमेंटची क्षमता १० एमटीपीए असून क्रिष्णपटनाम (२ एमटीपीए) व जोधपूर (२ एमटीपीए) अशी एकूण ४ एमटीपीए येथे आगामी काळात नवीन प्रकल्पातून क्षमतेत वाढ होणार आहे.
 
२०१९ मध्ये पेन्ना कंपनीला सूचीबद्ध कंपनी व्हायचे होते मात्र त्यास यश मिळू शकले नाही. कंपनीने आपल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे कंपनीच्या ईबीआयटीडीएमध्ये (EBITDA) मध्ये ११ कोटींचे नुकसान झाले होते. प्रामुख्याने हे वाढलेल्या खर्चामुळे, वाढलेल्या अकार्यक्षमतेत वाढ झाल्याने कंपनीला नुकसान झाले होते.
 
प्रेस स्टेटमेंटनुसार, संपादनामुळे भारतातील सिमेंट व्यवसायातील अदानी समूहाचा बाजार हिस्सा २ टक्क्यांनी वाढून १६ टक्क्यांनी वाढेल. मे गुंतवणूकदारांच्या सादरीकरणात, कंपनीने २०२८ पर्यंत भारतीय सिमेंट बाजारात २० टक्के वाटा घेण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये समुहाने संघी (Sanghi Cement) चे अधिग्रहण केले होते.
 
या अधिग्रहणानंतर शुक्रवारी सकाळच्या सत्रात अदानी समुहाच्या समभागात वाढ झाली आहे. एनएसईत हा समभाग (Share) ६८९ रुपयांवर पोहोचला होता तर सकाळी बीएसईत समभाग १.९९ टक्क्यांपर्यंत वाढत ६७७.५० रुपयांवर पोहोचला होता.