मुंबई: शेअर बाजारातील बाजार भांडवलात विक्रमी वाढ झाली आहे. गुरूवारी शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याने बीएसई (BSE) शेअर बाजारातील कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Capitalisation) मध्ये विक्रमी वाढ झाली आहे. युएस व भारतीय बाजारा त महागाई आकडेवारी जाहीर झाल्यानंतर आशियाई बाजारात देखील मोठी वाढ झाली.
सकाळी ११.५७ वाजेपर्यंत बीएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल ४३१.०५ लाख कोटींवर पोहोचले आहे. आतापर्यंत बीएसईतील झा लेला सर्वात मोठा विक्रम आहे. सकाळी १२ वाजेपर्यंत सेन्सेक्स २५७.७८ अंशाने वाढत ७६८५७.३५ पातळीवर पोहोचला आहे. का ल शेअर बाजारात रॅली झाली होती. त्यानंतर पुन्हा सकाळच्या सत्रात आयटी समभागात देखील मोठी वाढ झाली. या बरोबरच मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाल्याने बाजारात मोठा पाठिंबा मिळाला होता.
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६३ व ०.५४ टक्क्यांनी वाढ झाली होती. केआयओसीएल (११.४३%), रेणुका (१०.६७ %), डीबीएल (९.९८%), बजाज हिंद (९.६६%), होमफर्स्ट (७.८९%) या समभागात सर्वाधिक वाढ झाली होती. तसेच रिलायन्स, इंड सइंड बँक, आयटीसी, एसबीआय, कोटक महिंद्रा, एचडीएफसी बँक या समभागात (Shares) मध्ये वाढ झाली होती.