१०० दिवसांचा कृषी कृती आराखडा तयार करणार!

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

    12-Jun-2024
Total Views |
shivrajsingh chauhan agri plan


नवी दिल्ली :    देशातील कृषीक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार १०० दिवसांच्या कृती आराखड्याची आखणी करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पहिल्या १०० दिवसांच्या विभागीय कृती आराखड्यातील सर्व बाबी समजून घेऊन देशातील कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले. शेतकरी बंधू-भगिनींना खते, बियाणे यांची प्राधान्याने केली जावी, त्यांना याबाबत कोणतीही अडचण येऊ नये याची विशेष काळजी घेण्यात यावी, असे केंद्रीय मंत्री चौहान यांनी म्हटले आहे.

आपल्या देशांतर्गत गरजा भागवण्याबरोबरच देशातील कृषी उत्पादन आणि उत्पादकता वाढली पाहिजे, यासाठी आपण आवश्यकतेनुसार दर्जेदार कृषी उत्पादनांची निर्यात करू शकू, यावरही कृषीमंत्री चौहान यांनी भर दिला. बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागनिहाय योजनांचे सादरीकरण केले.