मुंबई: भारतातील किरकोळ महागाई (Retail Inflation) घसरण झाली आहे. आज भारतातील किरकोळ महागाईचे दर जाहीर होणार होते. सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे ज्यामध्ये वर्षाच्या बेसिसवर महागाईत ११ महिन्यातील सर्वाधिक घट झाली आ हे.या महिन्यात महागाई दर ४.७५ टक्क्यांवर राहिला आहे मागील महिन्यात हा दर ४.८३ टक्के होता जो ४.७५ टक्क्यांवर आला आ हे.
आरबीआयच्या २ ते ६ टक्यांच्या मर्यादेत ही महागाई आकडेवारी आल्याने बाजारात आगामी काळात आरबीआय व्याजदरात कपा त होईल यावर बाजाराचे लक्ष राहू शकते. मे महिन्यातील महागाईत कुठलाही बदल झालेला नाही. मे महिन्यातील महागाई दर ०.४८ टक्क्यांवर कायम राहिला आहे. अन्नाच्या महागाईत देखील घट झाली आहे. ह महागाई दर ८.७५ वरून ८.६२ टक्क्यांवर घसरला आहे. मे महिन्यातील ३.३ टक्क्यांहून अन्नधान्याच्या महागाईत वाढ झाली आहे.
ग्रामीण भागातील ५.४३ टक्क्यांवर कमी होत ५.२८ टक्क्यांवर पोहोचले आहे. शहरी महागाई दर मे महिन्यातील ५.४३ टक्क्यांवर पोहोचले आहे. एप्रिल महिन्यातील २७.८ टक्क्यांच्या तुलनेत वर्षाच्या बेसिसवर घसरत २७.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. कडधान्य व डाळींच्या महागाई निर्देशांक ८.६९ व १७.१४ टक्क्यांवर पोहोचली आहे.
नुकत्याच झालेल्या एमपीसी (MPC) म्हणजेच वित्तीय धोरणाची बैठकीत आठव्यांदा रेपो दरात वाढ न करता स्थिर ठेवला होता. ज्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी महागाई ४ टक्यांच्या कक्षेत राहिल असे म्हटले होते.