महाराष्ट्र आणि बाडेन-वुटेनबर्ग मधील करार मैलाचा दगड ठरेल -मुख्यमंत्री

    12-Jun-2024
Total Views | 45

eknath shinde
 
 
मुंबई: महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यात यांच्यात उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्याकरिता झाले ला करार हा मानव संसाधन विकास क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे. या करारामुळे दोन्ही राज्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार असून भविष्यातील विविध क्षेत्रातील सहकार्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
 
युरोपीयन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृती गटाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती गटाच्या पुढाकारातून महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन- वुटेनबर्ग या औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्यात कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत करार फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आला आहे. या कराराच्या अनुषंगाने सुका णू समितीची बैठक जर्मनीतील स्टुटगार्ड येथे पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला.त्यावे ळी ते बोलत होते.
 
स्टुटगार्ड येथील या बैठकीत महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह बाडेन-वुटेनबर्गचे मुख्यमंत्री विनफ्रीड क्रेत्शमन, राज्याचे कुलपती डॉ फ्लोरिअन स्टेगमन, सामाजिक व्यवहार मंत्री मान्ने लुचा, शिक्षण मंत्री थेरेसा स्कॉपर, विज्ञान मंत्री पेट्रा ओल्शोव्स्की, आर्थिक व्यवहार मंत्री डॉ. निकोल हॉफमिस्टर-क्रॉट व इतर मान्यवर सहभागी झाले होते.
 
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, भारत आणि जर्मनी यांच्या मध्ये अनेक दशकांपासून दि्वपक्षीय संबंध आहेत. महाराष्ट्र आणि वुटे नबर्ग मधील हा सामंजस्य करार या मजबूत भागिदारीचा पुरावा आहे. या करारामुळे जर्मनीतील मनुष्यबळाची समस्या सुट ण्या बरोबरच महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळाला आंतरराष्ट्रीय अनुभव मिळण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील तरुणांसा ठी नवीन रोजगार संधी निर्माण करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल बाडेन-वुटेनबर्ग राज्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आभार मान ले. तसेच हा करार मानव संसाधन विकासातील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे फायदे जगाला दाखणारा असून हे इतर देशांसाठी एक मॉडेल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
 
या बैठकीत महाराष्ट्रातील मनुष्यबळ आणि कौशल्य विकासाच्या योजनांविषयी तसेच बाडेन-वुटेनबर्ग राज्याच्या औद्योगिक वि कासाविषयी सादरीकरण करण्यात आले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121