पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट! आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अटक

    01-Jun-2024
Total Views |
 
Shivani Agrawal
 
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघातप्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. शनिवारी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालची आई शिवानी अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण अग्रवाल कुटुंबच या अपघातप्रकरणात अडकलेलं आहे.
 
अपघाताच्या तपासाकरिता आरोपी वेदांत अग्रवालचे ब्लड सँपल घेण्यात आले होते. मात्र, ससून रुग्णालयात या ब्लड सँपलमध्ये फेरफार करण्यात आली. त्यामुळे ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनीच वेदांतचे ब्लड सँपल बदलल्याचा आरोप आहे.
 
बददलेले ब्लड सँपल एका महिलेचे असल्याचेही तपासात पुढे आली आहे. त्यामुळे हे ब्लड सँपल वेदांतची आई शिवानी अग्रवाल यांचे असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. याबद्दलची चौकशी करण्यासाठी आता शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.
 
यासंदर्भात आरोपी वेदांतची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी बालसुधारगृहात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता शिवानी वडेट्टीवार यांना घेऊन पोलिस बालसुधारगृहात गेले आहेत. त्यांच्यासमोर आरोपी वेदांतची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय वेदांतचे वडिल विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल हेदेखील तुरुंगात आहेत.