महायूती की, मविआ? कुणाला किती जागा? जाणून घ्या आकडेवारी...
01-Jun-2024
Total Views |
मुंबई : लोकसभा निवडणूकीचे मतदान संपन्न झाले असून शनिवार १ जून रोजी एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले आहेत. या आकड्यांनुसार महाराष्ट्रात कोण बाजी मारणार याबद्दलचे अंदाज पुढे आले आहेत. राज्यात महायूती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होता. दरम्यान, महाराष्ट्राने कुणाला कौल दिला, याचा अंदाज या आकडेवारीतून वर्तवण्यात आला आहे.
टीव्ही ९ पोलस्ट्राट एक्झिट पोल
टीव्ही ९ पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायूतीला २२ जागा तर महाविकास आघाडीला २५ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. यामध्ये भाजपला १८ जागा आणि शिवसेनेला ४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळताना दिसत नाही. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये उबाठा गटाला १४, काँग्रेसला ५ आणि शरद पवार गटाला ६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
एबीपी माझा सी व्होटर
एबीपी माझा सी व्होटर सर्वेनुसार महाराष्ट्रात महायूतीला २४ तर महाविकास आघाडीला २३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर एक जागा अपक्षाकडे राहणार आहे. यामध्ये महायूतीतील भाजपला १७, शिवसेनेला ६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला १ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच महाविकास आघाडीतील उबाठा गटाला ९, शरद पवार गटाला ६ आणि काँग्रेसला ८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.