महायुतीच्या प्रचारासाठी सोसायटी बैठक

    07-May-2024
Total Views |
south mumbai
 
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोसायटी बैठक मोहीम हाती घेतली आहे. मंत्री लोढा हे स्वतः या माध्यमातून दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्रातील विविध सोसायटीमधील नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. याद्वारे मंत्री लोढा यांनी परिसरातील सर्व सोसायटीमधील रहिवाश्यांसह एका बैठकीचे आयोजन केले, जनतेच्या सेवेसाठी काय करायला हवे, याबाबत त्यांची मते जाणून घेतली तसेच त्यांना महायुतीच्या उमेदवार श्रीमती यामिनी जाधव यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
 
दिनांक ६ मे रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली असून, त्या दिवशी मंत्री लोढा यांनी भुलाभाई देसाई रोड परिसर, ताडदेव, व्हीपी रोड गिरगाव परिसरातील सोसायट्यातील नागरिकांसह बैठक घेतली. त्याचप्रमाणे ७ मे रोजी देखील कुंबाला हिल परिसरातील आत्मज बिल्डिंग, ताडदेवमधील दर्शन प्राईड बिल्डिंग, गिरगावमधील आकाश दीप बिल्डिंग, खेतवाडी येथील संघवी गॅलक्सी आणि नेपियन्सी रोड येथील सिमला हाऊस येथे सोसायटी बैठकींचे आयोजन करण्यात आले.


south mumbai
 
"नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा सुरु आहे, विकासासाठी महायुतीच्या उमेदवार श्रीमती यामिनी जाधव यांना मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहोत. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहे. संपूर्ण देशात ४०० पारचा नारा खरा होईल, आणि नक्कीच दक्षिण मुंबईमध्ये यामिनी ताई जाधव यांचा विजय होईल" असे मंत्री लोढा यांनी याप्रसंगी सांगितले.