सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेल्या प्रकरणात राजस्थान कनेक्शन समोर आले आहे.
मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर १४ एप्रिल रोजी दोन आरोपींनी गोळीबार केला होता. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून पाचव्या आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आत्तापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आणि पाचव्या आरोपीला राजस्थान मधून अटक केल्याची माहिती समोर आली (Salman Khan) आहे.
सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी मोहम्मद चौधरी या पाचव्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, लवकरच पोलिस पथक त्याला मुंबईत घेऊन येणार आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आधी विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना गुजरातहून अटक केली होती. त्यानंतर या गोळीबारासाठी दोन पिस्तुले आणि काडतुसे पुरवणाऱ्या सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांना पंजाबमधून ताब्यात घेतले होते. या चारही आरोपींवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर विकी, सागर आणि अनुज या तिघांना मुंबई पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. पण अनुजने कोठडीतील शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली होती.