मुंबई: उत्तर पूर्वचे भाजप-महायुतीचे उमेदवार मिहिर कोटचा हे २४x७ लोकांसाठी काम करतात. त्यामुळे आपण त्यांना खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, दि. ७ मे रोजी केले. उत्तर पूर्व मतदारसंघात आयोजित महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआयसह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, मुंबई या मतदारसंघाचा अहवाल कोटेचा यांच्या बाजूने आहेत. जरी लोक आमच्या बाजूने असले तरी मतदान होईपर्यंत उसंत घेता नये. आपण आपली केंद्र आणि राज्य पातळीवरील विकास कामे लोकांपर्यंत घेवून गेले पाहिजे. कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरवले जातील. त्यामुळे सर्व मतभेद बाजूला ठेवावेत आणि सर्वांनी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुतीसाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विरोधकांकडे मुद्दे नाहीत - कोटेचा
कोटचा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, "या मतदारसंघातून माझे नाव जाहीर होऊन ५३ दिवस झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेल्या विकासकामाची गंगा घरोघरी पोहोचली आहे, असा अनुभव मला प्रचारात आला. विरोधकांकडे बोलायला काही नसल्यामुळे केवळ ३-४ मुद्द्यांची पुनरावृत्ती करत आहेत. पण लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. महायुतीमध्ये सात पक्ष आहेत, पण आपण एका टीमसारखे काम करत आहोत", असे कोटेचा म्हणाले.