मुंबई : प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस अशा ‘मेट गाला २०२४’ (Alia Bhatt) या इव्हेंटला सुरुवात झाली आहे. मेट गाला सोहळा न्यूयॉर्कमधील मॅनहटन येथे आयोजित करण्यात आला असून जगभरातील कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. या सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) सर्वांचं लक्ष वेधून घेतले. आलियाचा परदेशातील हा देसी अंदाज उपस्थितांना विशेष भावला. परदेशात साडी नेसून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे ने सध्या सोशल मीडियावर आलियाचं कौतुक करण्यात येत आहे.
‘मेट गाला २०२४’ मध्ये आलियाने मिंट ग्रीन रंगाची सुंदर अशी डिझायनर साडी नेसली असून प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने तिच्यासाठी ही खास साडी डिझाईन केली होती. दरम्यान, आलियाने परिधान केलेल्या या साडीची वैशिष्ट्ये आता समोर आली आहेत. तब्बल १६३ कारागिरांनी मिळून आलियाची ही खास साडी डिझाइन केली असून ती तयार करण्यासाठी एकूण १९६५ तास लागले होते. याव्यतिरिक्त या साडीत सब्यसाचीने एक लाँग ट्रेल जोडल्यामुळे आलियाचा लूक अधिक खुलून दिसत आहे. आलिया भट्ट लवकरच ‘जिगरा’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती याच चित्रपटाच्या निर्मितीमध्ये देखील सहभागी असणार असे समजत आहे.