मेरे पास माँ है : अजित पवार

    07-May-2024
Total Views |
 
Ajit Pawar
 
पुणे : माझ्यासोबत माझी आई आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मतदानानंतर अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली होती. यावरून आता माझ्यासोबत माझी आई आहे असं म्हणत अजितदादांनी त्यांना सुनावलं आहे.
 
अजित पवार म्हणाले की, "माझी आई कोल्हापूरमध्ये गेली नव्हती. एका नातेवाईकांच्या लग्नाच्या कार्यक्रमाकरिता माझी आई पुण्याला गेली होती. मी तिकडे गेल्यावर ती मला म्हणाली होती की, मी तुझ्यासोबत मतदानाला येणार आहे. त्यानंतर मी, सुनेत्रा आणि आई आम्ही तिघे इथे आलो आहोत. आईचा मला आशीर्वाद आणि पाठिंबा आहे कारण ती माझी आई आहे."
 
हे वाचलंत का? -  "सोशल मीडियावर गैरसमज पसरवणं हे रोहित पवारांचं एकमेव काम!"
 
"ही निवडणूक भावकीची नाही हे मी सातत्याने जनतेला सांगतो आहे. तरीसुद्धा समोरच्या लोकांनी कुटुंबातील काहीजण त्यांच्यासोबत आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतू, पवार परिवारात आशाताई अनंतराव पवार या वयाने सगळ्यात जेष्ठ आहेत. आज माझी आई माझ्याबरोबर आहे. त्यामुळे जे आरोप करतात त्यांच्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे," असेही ते म्हणाले.