ममतांचा मीम व्हिडिओ शेअर करणाऱ्या नेटकऱ्याला बंगाल पोलिसांनी 'एक्स'वर दिली धमकी

    06-May-2024
Total Views |
Mamata Banarjee
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक मीम व्हिडिओ शेअर केला एक 'एक्स' वापरकर्त्याला पश्चिम बंगाल पोलिसांनी एक्सवरच धमकावले आहे. सोमवार, दि. ६ मे २०२४ रोजी कोलकाता पोलिसांच्या डीसीपी गुन्हे शाखेच्या अधिकृत खात्याने एका वापरकर्त्याला त्याची ओळख उघड करण्यास सांगितले. पोलिसांनी त्याला त्याचे नाव आणि पत्ता सांगण्यास सांगितले.
 
कोलकाता पोलिसांनी मेम व्हिडिओला उत्तर देताना लिहिले की, “तुम्हाला तुमचे नाव, पत्ता आणि तुमची ओळख तात्काळ उघड करण्याचे आदेश दिले आहेत. मागितलेली माहिती उघड न केल्यास, CrPC च्या कलम ४२ अंतर्गत कायदेशीर कारवाईसाठी तुम्ही जबाबदार असाल.”
 
 
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर बनवलेल्या मीम व्हिडिओला उत्तर म्हणून हे ट्विट करण्यात आले आहे. ममता बॅनर्जी एका गाण्यावर नाचताना दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ४०० हून अधिक वेळा रिट्विट झाला आहे.
 
कोलकाता पोलिसांनी या वापरकर्त्याला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही सोशल मीडियाचा वापर आक्षेपार्ह, दुर्भावनापूर्ण आणि प्रक्षोभक पोस्ट करण्यासाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तुम्हाला ही पोस्ट काढून टाकण्याचे आणि तसे करण्यापासून परावृत्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अन्यथा तुम्ही नियमांनुसार कठोर दंडात्मक कारवाईला जबाबदार असाल.” मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा हा व्हिडिओ शेअर केल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असे कोलकाता पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.