'फॅमिली मॅन ३' च्या शूटींगला सुरुवात! श्रीकांत तिवारी येणार पुन्हा भेटीला

    06-May-2024
Total Views |

family man  
 
 
मुंबई : अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या फॅमिली मॅन या वेब सीरीजची क्रेझ प्रेक्षकांमध्ये प्रचंड आहे. 'फॅमिली मॅन ३' (Family Man 3) कधी येणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. फॅमिली मॅनचे दोन सीझन लोकप्रिय झाल्यानंतर आता तिसरा सीझन लवकरच येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'फॅमिली मॅन ३' (Family Man 3) च्या शूटींगला सुरुवात झाली असून श्रीकांत तिवारीला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
 

family man  
 
'फॅमिली मॅन ३' बद्दल अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने दिलेल्या माहितीनुसार शुटींगला सुरुवात एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत तिवारी यांची दोन्ही मुलं मोठी झालेली दिसून येत आहेत. आता तिसऱ्या सीझनमध्ये त्यांच्या कुटुंबातील वाद आणि श्रीकांतची नोकरी याचे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचली आहे.