अक्षयतृतीयेपूर्वी क्रूड, सोने चांदीत मोठी वाढ !

जागतिक पातळीवरील निर्देशांकात वाढ झाल्याने भारतीय बाजारात परिणाम

    06-May-2024
Total Views |

Gold
 
 
मुंबई: अक्षयतृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाल्याने त्यांचे परिणाम भारतीय बाजारात झाले आहेत. कालपासून स्वस्त झालेले सोन्याचे भाव दुपारनंतर पुन्हा वधारले आहेत.युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर भारतातील एमसीएक्स (Mutli Commodity Exchange) मध्ये सोन्याच्या दरात संध्याकाळपर्यंत ०.६४ टक्क्यांनी वाढ झाली असून एमसीएक्सवरील सोन्याचे दर ७१११९.०० पातळीवर पोहोचले आहे. चांदीच्या निर्देशांकातही १.५४ टक्क्यांनी वाढ झाल्याने चांदी प्रति किलो ८२२९०.०० पातळीवर पोहोचली आहे.
 
'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतामध्ये सोन्याचे दर साधारणपणे प्रति ग्रॅम २० रुपयांनी वाढले आहेत. भारताची सरासरी सोन्याची किंमत २२ कॅरेट सोन्याचे दर ६६०५ रुपयावर व २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम ७२०५ रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईत २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममध्ये २०० रुपयांनी तर २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात २२० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ ग्रॅम सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १६० रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत चांदीचे प्रति किलो दर १००० रुपयांनी वाढले आहेत.
 
देशातील सोने चांदीचे सुधारित दर -
 
२२ कॅरेट -( १० ग्रॅम) - ६६०५० रुपये
२४ कॅरेट-( १० ग्रॅम) - ७२०५० रुपये
चांदी - १ किलो - ८४००० रुपये
 
मुंबईतील सोन्याचे दर -
 
२२ कॅरेट-(१० ग्रॅम) - ६६०५० रुपये
२४ कॅरेट- (१० ग्रॅम) - ७२०५० रुपये
चांदी - १ किलो - ८४००० रुपये
 
क्रूडही महागले
 
जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या निर्देशांकात आज मोठी वाढ झाली आहे. सौदी अरेबियाने आशियाई बाजारातील क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ करण्याचे ठरवले होते. याशिवाय ओपेक (OPEC) राष्ट्रानी तेलाच्या उत्पादनात घट केल्याने पुरवठ्यापेक्षा मागणीत वाढ झाल्याने ही दरवाढ झाली आहे. WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एमसीएक्सवरील क्रूड तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.७२ टक्क्यांनी वाढ होत तेल ६५९३.०० रुपये प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
 
आज सरासरी पेट्रोलची किंमत १०४.२१ प्रति लिटर व डिझेल किंमत ९२.१५ रुपये प्रति लिटर आहे.