नसीम खान काँग्रेसचा प्रचार करणार? पक्षश्रेष्ठींकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

    04-May-2024
Total Views | 73

Naseem Khan 
 
मुंबई : स्टार प्रचारकपदाचा राजीनामा देणारे काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पुण्यात त्यांची समजूत काढली आहे. त्यामुळे आता ते प्रचारात सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
काही दिवसांपूर्वी नसीम खान यांनी आपल्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला होता. पक्षाने महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार न दिल्याने ते नाराज होते. यातूनच त्यांनी राजीनामा देत यापुढे काँग्रेसचा प्रचार करणार नाही असे जाहीर केले होते. लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी एकाही जागेवर अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला नसल्याने समाजात तीव्र नाराजी आहे, असे त्यांनी सांगितले होते.
 
हे वाचलंत का? -  कांदा निर्यातबंदी उठली! 'या' देशात होणार निर्यात
 
याच नाराजीतून त्यांचा प्रचारात सहभागही दिसून येत नव्हता. मात्र, आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यात काँग्रेस नेते राहूल गांधी, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि चंद्रकांत हंडोरे यांनी नसीम खान यांची समजूत काढल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121