नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४च्या अंतिम टप्प्यातील मतदान राहिले असतानाच देशाच्या आर्थिक स्थितीबाबत आनंदवार्ता आली आहे. देशाच्या जीडीपी वाढीच्या दराने भारताला आनंदाची बातमी दिली असून मागील वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत ७.८ टक्के वेगाने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. येत्या ०४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून त्याआधीच आर्थिक वार्ता समोर आली आहे.
दरम्यान, जागतिक संकट ठरलेल्या कोरोना महामारीत देशाने आर्थिक संकटावर मात करत जीडीपी दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता निवडणूक निकालाआधीच केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ८.२% च्या वेगाने वाढली आहे, जी कायम राहण्याची शक्यता आहे.
तसेच, मागील तिमाहीतही, विश्लेषकांनी भारताचा जीडीपी विकास दर ८.४% असा अंदाज वर्तवला होता, परंतु आकडेवारी समोर आली तेव्हा तो ८.६% होता. जर आपण पूर्वीच्या काळाबद्दल बोललो तर, देशाचा जीडीपी वाढीचा दर पहिल्या सत्रात ८.२% आणि दुसऱ्या सत्रात ८.१% होता. वास्तविकपणे, जागतिक कोरोना महामारीनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेला वेग आल्याचे दिसून आले आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्क्यांच्या विकास दराने वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु आता ती ८.२ टक्क्यांपर्यंत गेली आहे. सरकारी धोरणे केवळ अपेक्षांची पूर्तता करत नसून तर त्याची योग्य अंमलबजावणीही होत आहेत. देशाची 'ग्रॉस डोमेस्टिक व्हॅल्यू (जीडीव्ही)' देखील ७.२ टक्के वेगाने वाढले आहे.