म.रे. मेगाब्लॉक काळात निवडणूक कर्मचाऱ्यांना दिलासा!
31-May-2024
Total Views | 26
मुंबई : मध्य रेल्वेवरील ३ दिवसीय जम्बो मेगाब्लॉक कालावधीत राज्य निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य होणार नसल्याने सदर दिवसांची भरपाई देण्यात यावी, असे परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ३ दिवसांच्या मेगाब्लॉकमध्ये ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणे शक्य होणार नाही, त्यांना त्या दिवसांची भरपाई दिली जाणार आहे. यानिर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी व ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामासाठी ३ दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून रस्ते मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे. मुंबईच्या दिशेने कामाला येणाऱ्या प्रवाशांना रस्ते मार्गाचा पर्याय अवलंबवावा लागत आहे.