विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

    31-May-2024
Total Views |
 

Agrawal
 
पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघातातील आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयील कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ केली होती.
 
कार चालकाला डांबून ठेवत स्वत:च्या अंगावर गुन्हा घेण्यासाठी धमकावल्याचा आरोपात विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३१ मे रोजी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने या दोघांनाही १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
हे वाचलंत का? -  धनगर आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करणार! गोपीचंद पडळकरांची माहिती
 
याप्रकरणात रोज नवनवीन बाबी पुढे येत आहेत. विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या दोघांचेही मोबाईल आणि वाहन जप्त करण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे. तसेच पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाला अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे.