'कुणाला सांगशील तर अल्लाह माफ करणार नाही'; कुराणचं भय दाखवून मौलवीने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
31-May-2024
Total Views |
पाटणा : बिहारमधील मधुबनी येथे एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार मौलवी असलेल्या शाहनवाजने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मौलवी पीडितेला कुराणाची शपथ देऊन 'कुणाला सांगशील तर अल्लाह माफ करणार नाही' असे म्हणत एका वर्षाहून अधिक काळ पीडित मुलीवर बलात्कार करत होता. मुलांचे वर्ग संपले की तो मुलीला थांबवून तिच्या तोंडात कपडा भरून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. एवढेच नाही तर कोणाशी बोलल्यास चाकूचा धाक दाखवत असे.
भीतीमुळे मुलगी कुणालाही काही सांगू शकली नाही, मात्र ती सात महिन्यांची गरोदर राहिल्याने घरच्यांना संशय आला, तेव्हाच ही बाब उघडकीस आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण मधुबनी जिल्ह्यातील खुटौना पोलीस स्टेशन परिसरातील आहे. जिथे मौलवी शाहनवाज एका मदरशाचा प्रमुख होता, ज्यावर मुलांना कुराणचे आयते शिकवण्याची जबाबदारी होती. त्याने मदरशातील मुलीला आपली शिकार बनवण्यास सुरुवात केली.
कुराण शिकवण्याच्या नावाखाली मौलवीने अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवायला सुरुवात केली. पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शाहनवाज माझ्या मुलीला कुराणची भीती दाखवत असे आणि तिने कोणाला काही सांगितले तर अल्लाह माफ करणार नाही, असे म्हटले आहे. त्याने चाकूचा धाकही दाखवला. मात्र मुलीच्या शरीरात होत असलेले बदल कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर चौकशीत ही बाब समोर आली.
पीडितेच्या आईने सांगितले की, मौलवीने मुलीच्या वडिलांना 'तुझी मुलगी अभ्यासात चांगली आहे, तिला माझ्याकडे अभ्यासासाठी पाठवा' असे सांगितले होते. या प्रकरणी खुटौना पोलिस स्टेशनचे प्रभारी नितीश कुमार यांनी सांगितले की, एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत. मदरशाच्या प्रमुख मौलवीने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची बातमी आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तसेच संतप्त लोकांनी मदरशाला टाळे ठोकले आहे.