भारतीय जीडीपीचे निकाल जबरदस्त ७.८ टक्क्यांवर भारताचा जीडीपी पोहोचला

संपूर्ण वर्षासाठी हा आकडा ८.२ टक्क्यांवर

    31-May-2024
Total Views |

gdp
 
 
मुंबई: आज सरकारची जीडीपीची आकडेवारी समोर येणार असल्याने आर्थिक विश्वात उत्सुकता होती. अखेर सरकारच्या सांख्यिकी और कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाने सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आकडेवारी जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढला आहे. संपूर्ण वर्षासाठी हा आकडा ८.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. भारताचा जीडीपी वर्षानुवर्षे आधारित (YoY) जानेवारी ते मार्च महिन्यात ८.२ टक्क्यांनी वाढला आहे. अनेक तज्ञांनी भारताचा जीडीपी दर ६.७ पर्यंत वाढेल असे अपेक्षित केले होते. मात्र अंदाजापेक्षा अधिक वेगाने भारताचा जीडीपी वाढला आहे.
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या वार्षिक अहवालात आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी घोडदौड करेल असे म्हटले गेले होते.आरबीआय मते आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत ७.० वरून ७.६ टक्क्यांवर पोहोचली होती. आणि आता ७ टक्क्यांवर वाढत आहे असे आरबीआयने म्हटले आहे. तसेच सांख्यिकी मंत्रालयाने स्पष्ट केलेल्या आकडेवारीनुसार,भारताची वित्तीय तूट (Fiscal Deficit) सरकारच्या ५.८ टक्क्यांचा मर्यादेपेक्षा कमी राहिले आहे. भारताची वित्तीय तूट १६.५४ ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे जी मर्यादेचा तुलनेत ९५.३ टक्के आहे.
 
१ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षात भारताच्या विकास दरात ८.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारताचा जीवीए (Gross Value Added) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ७.२ टक्क्यांनी व आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ६.७ टक्क्यांनी वाढला आहे. या माहितीप्रमाणे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये उत्पादन क्षेत्रातील ९.९ टक्के वाढलेल्या संख्येने ही वाढ प्रामुख्याने झाली आहे तर आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील उत्पादन (Manufacturing) क्षेत्रातील २.२ टक्के घट झाल्याने ही वाढ ७.१ टक्क्यांवर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही वाढ १.९ टक्क्यांनी वाढ खाणकाम क्षेत्रातील वाढीमुळे झाली असल्याचे सांख्यिकी विभागाने सांगितले आहे. तसेच जीडीपीची दरवाढ आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ७.० टक्यांच्या तुलनेत ८.२ टक्क्यांपर्यंत दर वाढला आहे.
 
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक क्षेत्रात शेती व खाणकाम यामध्ये २.१ टक्क्यांनी वार्षिक आधारावर वाढ झाली आहे. शेती व खाणकामात अनुक्रमे १.४ व ,७.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षी ही अनुक्रमे ४.७ व १.९ टक्के झाली होती. तर दुय्यम क्षेत्रात उत्पादन, इलेक्ट्रिसीटी, बांधकाम या क्षेत्रात ९.७ टक्क्यांनी या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे.