संघ शिक्षा वर्गाच्या समापन समारोहात श्री रामगिरी जी महाराज राहणार उपस्थित
30-May-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Nagpur) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपुर महानगरचा 'कार्यकर्ता विकास वर्ग - द्वितीय' सध्या रेशिमबाग येथे होत आहे. या वर्गाचा समारोप सोमवार, दि. १० जून रोजी संध्याकाळी ६.३० वा. होत असून प्रमुख अतिथी म्हणून श्री क्षेत्र गोदावरी धाम, सराला बेट, छत्रपती संभाजीनगरचे पीठाधीश महंत गुरुवर्य श्री रामगिरी जी महाराज यांची विशेष उपस्थिती असेल. दरम्यान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत उपस्थितांना संबोधित करतील. सदर समापन समारोहास सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.