मुंबईत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारंभ

    30-May-2024
Total Views | 55

Trishatabdi Jayanti Samarambh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचे ३०० वे जयंती वर्ष सुरु होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात त्रिशताब्दी साजरी होणार आहे. मुंबई विद्यापीठ लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र आणि समरसता साहित्य परिषद (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम शुक्रवार, दि. ३१ मे रोजी संध्याकाळी ४.४५ वा. सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृह, मुंबई विद्यापीठ, फोर्ट येथे संपन्न होईल.

हे वाचलंत का? : लोकमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी महोत्सव ३१ मे पासून होणार सुरू

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, चेंबुर चे संचालक प्रा. डॉ. सतीश मोढ यांची उपस्थिती असेल. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला असेल. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. रविंद्र कुलकर्णी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121