मुंबई:आदित्य बिर्ला समुहाने आपली कंपनी आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड (ABHFL) या आपल्या कंपनीला ३०० कोटीचा निधी देणार असल्याचे सांगितले आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच तरलता व लेवरेज गुणोत्तर सुधारण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
आदित्य बिर्ला कॅपिटलने आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या ३०० कोटींचे शेअर खरेदी करून कंपनीला निधी पुरवला आहे. राईट बेसिसवर हे इक्विटी शेअर्स आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीकडून खरेदी करण्यात आलेले आहे. यापूर्वी आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३३ टक्क्यांनी निव्वळ नफ्यात वाढ होत ८१२ कोटींचा नफा मिळाला होता.
काही अपवाद वगळता कंपनीला एकत्रित निव्वळ नफा १२४५ कोटींचा झाला होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये आदित्य बिर्ला कॅपिटलने आपल्यातील ५ टक्के भागभांडवल आदित्य बिर्ला सन लाईफ कंपनीला विकले होते. कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर १२०७९ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. याशिवाय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनी आपल्या व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्तेत २५-३० टक्क्यांची वाढ अपेक्षित करत आहे.
कंपनीच्या सरासरी तिकिट आकाराची (Ticket Size) ची किंमत २८ लाख रुपये आहे. त्यांच्या एकूण सेवेत ४१ टक्के वाटा परवडणारी घरे आहेत.